भास्करराव पेरे पाटील यांनी केली खंत व्यक्त निघोज | नगर सह्याद्री समाजाभिमुख काम करताना राजकारणांपेक्षा धार्मिक संप्रदाय सर्वाधिक महत्वाचा अस...
भास्करराव पेरे पाटील यांनी केली खंत व्यक्त
निघोज | नगर सह्याद्रीसमाजाभिमुख काम करताना राजकारणांपेक्षा धार्मिक संप्रदाय सर्वाधिक महत्वाचा असून स्वार्थी प्रवृत्ती वाढल्याने राजकारण बदनाम होत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
निघोज येथील कन्हैया दूध उद्योग समूहाच्या २६ व्या वर्धापनदिन सप्ताह निमीत्ताने आयोजित केलेल्या पेरे पाटील यांच्या व्याख्यानरुपी किर्तनाला मोठी गर्दी झाली होती. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. जी एस महानगर बँकेचे संचालक बबन लंके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीएसआय उगले, हेडकॉन्स्टेबल पी एच डहाळे, भैरवनाथ पतसंस्थेचे कार्यलक्षी संचालक सोमनाथ वरखडे आदी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर तसेच भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेरे पाटील म्हणाले, गेली पंधरा ते वीस वर्षं राजकारणापेक्षा समाजकारणात असल्याने आपल्याला गाव व परिसरातील विकासासाठी योगदान देता आले. सामाजिक कामांच्या माध्यमातून २२ देशाचा दौरा आपण केला. मात्र सामाजिक व धार्मिक कार्य फार महत्त्वाचे असल्याचा प्रत्यय आपल्याला आला. कष्ट आणी प्रामाणिक जिवण यातून काय साध्य करता येते याची महती कन्हैयाने दाखवून दिली आहे. कन्हैयाचे शांताराम लंके, बबन लंके, मच्छिंद्र लंके यांनी गेली २६ वर्षात धार्मिक व सामाजिक कार्यात योगदान देऊन सर्वसामान्य जनतेला पाठबळ देण्याचे काम केले. कन्हैयाचे नाव आज सातासमुद्रापार झाले आहे. देवांचा आशिर्वाद आणी सर्वसामान्य जनतेचे प्रेम यामुळे कन्हैया भोवती स्नेहभाव निर्माण झाला असून लंके कुटुंबाने समाजाप्रती मोठे योगदान दिल्याने धार्मिकता वाढीस लागली असून आजच्या युवकांनी राजकारणापेक्षा समाजकारणात काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS