मुंबई। नगर सहयाद्री - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटच्या आठवडा सुरू आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांव...
मुंबई। नगर सहयाद्री -
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटच्या आठवडा सुरू आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विधानसभेत थोडा वेळा का होईना रंगलेल्या विनोदी जुगलबंदीमुळे विधानसभेतील वातावरण हलकंफुलकं झालं. परंतु आज विधानसभेत रंगलेल्या काही विनोदांनी हे वातावरण थोडं का होईना हलकं फुलंक झालं.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, विधिमंडळात चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी लग्नाच्या विषयावरून आदित्य ठाकरे यांना एक कोपरखळी लगावली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील त्याच्या कोपरखळीवर विनोदी शैलीत पलटवार केला. यामुळे विधानसभेतील सदस्य खळखळून हसले.
बच्चू कडू यांनी प्रकल्प बंद झाल्यामुळे कामगार रस्त्यावर येत असल्याचा विषय मांडताना आधी लग्न जमलं आणि आता तुटलं त्याची जबाबादारी कोण घेणार असा प्रश्व विचारला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बच्चू कडू यांनी लग्नाचा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून का विचारला होता का? यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला.
फडणवीस म्हणाले 'सरकार जबाबदारी घेण्यास तयार आहे'. फडणवीसांच्या या उत्तरानंतर पुन्हा एकदा विधासभेत हशा पिकला. यानंतर आदित ठाकरे बोलण्यास उभे राहिले आणि त्यांनी फडणवीसांच्या कोपरखळीवर विनोदी शैलीत पलटवार केला. 'ही काही राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देतो, नाहीतर आमच्या सोबत बसा' असा पलटवार आदित्य ठाकरेंनी केला.
COMMENTS