निघोज | नगर सह्याद्री मंळगंगा यात्रा ग्रामस्थ वर्गणी, विकासकामे, बैलगाडा शर्यतीमधील भांडणे आदी विषयासंदर्भात शुक्रवार दि.३१ मार्चच्या निघ...
निघोज | नगर सह्याद्री
मंळगंगा यात्रा ग्रामस्थ वर्गणी, विकासकामे, बैलगाडा शर्यतीमधील भांडणे आदी विषयासंदर्भात शुक्रवार दि.३१ मार्चच्या निघोज ग्रामसभेत वादावादी झाली.
उपसरपंच माऊली वरखडे या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सरपंच चित्राताई वराळ पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सोसायटीचे चेअरमन सुनील वराळ, व्हा. चेअरमन वसंत ढवण, माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, माजी उपसभापती खंडू भुकन, कांता लंके, अर्जुन लामखडे, रुपेश ढवण, रामदास महाराज वराळ, माजी सरपंच ठकाराम लंके, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, विठ्ठलराव कवाद, दिलीप ढवण, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, अनंतराव वरखडे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद आदिंनी सुचना मांडली. यावेळी मळगंगा देवीचे वर्गणी व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी वर्गणी ट्रस्ट पावतीवर घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ग्रामस्थ वर्गणीचा हिशोब स्वतंत्र असावा अशी मागणीही काही लोकांनी केली. विकासकामे मोठ्या प्रमाणात व सर्व प्रभागात करण्यात यावेत. ग्रामसभा अखंड हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रम बघूनच का घेण्यात आली. असाही प्रश्न उपस्थित झाला. यावेळी काल्याचा कार्यक्रम असल्याने ग्रामसभा उरकती घेण्यात आली. शेवटी उपसरपंच माऊली वरखडे यांनी आभार मानले. ग्रामसभा संपल्यावर आजी, माजी पदाधिकार्यांची रस्त्यावरच हमरीतुमरी झाली. हा विषय निघोज व परिसरात चर्चेचा ठरला.
COMMENTS