मुंबई | नगर सह्याद्री- राज्यात पुढील ७२ तासांत विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शयता हवामान खात्याने वर्तविली आहे. एक...
मुंबई | नगर सह्याद्री-
राज्यात पुढील ७२ तासांत विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शयता हवामान खात्याने वर्तविली आहे. एकीकडे तापमानात होणारी वाढ आणि दुसरीकडे शेतकर्यांसमोर आसमानी संकट यामुळे बळीराजा हवालदिल आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. सलग दुसर्या दिवशी मुंबईचा पारा ३९ अंशावर गेला आहे. येत्या तीन दिवसांत हवामानाचे अनेक रंग पाहायला मिळणार आहेत. १५ ते १७ मार्चपर्यंत देशाच्या दक्षिणेकडील राज्यांत पाऊस पडण्याची शयता आहे. अशातच हवामान विभागाने पुढील ७२ तासांत राज्यात विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शयता वर्तवली आहे.
होळीनंतर राज्यातील तापमानात वाढ होत आहे. मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शयता आहे. कोकण आणि गोव्यात तुरळक आणि हलया पावसाच्या सरींची शयता आहे. विदर्भात १४ ते १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शयता आहे. कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शयता आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीचा अंदाज आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नंदुरबारला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
COMMENTS