पुणे। नगर सहयाद्री - पुण्यातील चाकण तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. मित्रांसोबत खेळायला गेलेला मुलगा संध्याकापर्यं...
पुणे। नगर सहयाद्री -
पुण्यातील चाकण तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. मित्रांसोबत खेळायला गेलेला मुलगा संध्याकापर्यंत घरी परतलाच नाही. शोधाशोध केली मात्र कुठेही सापडला नाही. घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी मुलगा कोणासोबत खेळत होता याची चौकशी केली. त्या मित्रांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. खाणीत पोहायला गेला असता मुलगा पाण्यत बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहिती नुसार, मुलगा आपल्या मित्रांसोबत खाणीत पोहायला गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्र बुडालेला पाहून मित्र घाबरले अन् ते आपापल्या घरी परतले. घरचे ओरडतील म्हणून त्यांनी याबाबत कोणालाच कळू दिलं नाही. मुलाच्या मित्रांनी सर्व मित्र खाणीत पोहायला गेल्याची कबुली पोलिसांकडे दिली.
पोलिसांनी तात्काळ खाणीच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं असता पाण्याबाहेर मुलाचे कपडे आढळले. यावरुन मुलगा पाण्यात बुडाल्याचं स्पष्ट झालं. पाण्यात त्याचा शोध घेण्यासाठी मावळच्या वन्यजीव रक्षक बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. या पथकाने पाण्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला.मुलाच्या मृत्यूची बाब समोर येताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांवक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
COMMENTS