जास्त रूपये घेणार्यांवर कारवाई करणार मुद्रांक जिल्हाधिकारी पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील स्टॅम्प विक्री करणारांकडुन सर्व सामान...
जास्त रूपये घेणार्यांवर कारवाई करणार मुद्रांक जिल्हाधिकारी
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील स्टॅम्प विक्री करणारांकडुन सर्व सामान्य माणसांची लुट केली जात असुन पारनेर तालुयात स्टॅम्पचा काळाबाजार जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे चढ्या भावाने विक्री करणार्या स्टॅम्प विक्री करणारांवर कारवाई करावी,अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने सर्जेराव शिंदे यांनी केली आहे.
बँक, पतसंस्था कर्ज प्रकरण, वैयक्तिक स्वयंघोषणा पत्र, नोटरी, विविध करारनामा करण्यासाठी नागरिकांना स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते मात्र पारनेर तालुयात प्रत्येक स्टॅम्प मागे १० रूपये जास्त घेतले जातात अशी तक्रार पोखरी येतील सर्जेराव शिंदे या शेतक-याने दुय्यम निबंधक यांच्याकडे केली आहे.याबाबत पोखरी येथील शिंदे म्हणाले, माझ्या विविध कामासाठी मला नेहमी स्टॅम्प लागत असतात. माझी शेती संगमनेर तालुयात देखील आहे. तेथे स्टॅम्प खरेदी केली असता १०० रूपयांचा स्टॅम्प १०० रूपयांनाच दिला गेला. नगर शहरात देखील हिच किंमत घेण्यात आली मात्र पारनेर शहरात वर्षानुवर्षे स्टॅम्प मागे १० रूपये जास्त घेतले जातात. हे कोणत्या आधारावर घेतले जातात याबाबत स्टॅम्प विक्रेते यांना विचारले असता त्यांनी हिच किंमत आहे वाटले तर घ्या अशी अरेरावीची भाषा पण वापरण्या आली असल्याची तक्रार शेतकर्याने केली आहे.
चढ्या दराने विक्री केल्यास कारवाई
कोणत्याही स्टॅम्प विक्रेत्यांनी स्टॅम्प मागे जास्त पैसे घेऊ नये नागरिकांनी देखील जास्त पैसे देऊ नयेत. १०० सह इतर स्टॅम्प त्याच किमतीला विकत घ्यावा तसे कोणी विक्रेते करत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल नागरिकांनी असे आढळल्यास नजिकच्या दुय्यम निबंधक कार्यालयास संपर्क साधून तक्रार करावी,असे मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल नढे यांनी म्हटले आहे.
शिवप्रहार संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा
पारनेर शहरातील स्टॅम्प विक्रेते वर्षानुवर्षे स्टॅम्प मागे १० रूपये जास्त घेतात. नागरिकांना विविध कामांसाठी स्टॅम्पची आवश्यकता असते. याबाबत दुय्यम निबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे यात दुरूस्ती न झाल्यास कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोतअसे सर्जेराव शिंदे म्हणाले.
COMMENTS