भाऊसाहेब थोरात यांनी संघर्षातून तालुक्यात समृद्धी आणली- प्रा. हिरालाल पगडाल अमृत उद्योग समूहाच्या वतीने 13 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सं...
भाऊसाहेब थोरात यांनी संघर्षातून तालुक्यात समृद्धी आणली- प्रा. हिरालाल पगडाल
अमृत उद्योग समूहाच्या वतीने 13 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
संगमनेर / नगर सहयाद्री -
कृषी औद्योगिक क्रांतीतून प्रेरणा घेत सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी भाऊसाहेब थोरात आणि आयुष्यभर काम केले मीटर हटाव पाण्यासाठीचा संघर्षासह समाज विकासाच्या अनेक मोहिमा यशस्वी करणारे भाऊसाहेब थोरात हे देव माणूस होते असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक मधुकरराव नवले यांनी केले आहे.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते
यावेळी बोलताना मधुकरराव नवले म्हणाले की, स्व. भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार चळवळीचा मार्ग निवडला. समाज वाचण्याचे सामर्थ्य असलेल्या दादांकडे दूरदृष्टी होती. त्यांनी आयुष्यभर अनेक योजना राबवल्या. पाण्यासाठी संघर्ष केला .मीटर हटाव चळवळ राबवली. सहकाराबरोबर शिक्षण आणि दुग्ध व्यवसायाची जोड देऊन संगमनेर तालुका समृद्ध बनवला .वाचण्याची आवड असलेल्या दादांनी एकही काम अर्ध्यावर सोडले नाही. वयाच्या उत्तरार्धात दंडकारण्य ही अभिनव योजना देशाला दिली. अनेक संकटे आली तरी त्यांनी विचार सोडला नाही. अशा थोर पुरुषांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने काम करणे गरजेचे आहे . तरुणांनी इतिहासाकडे पाठ करून महासत्तेची स्वप्न पाहणे चुकीची असल्याची ते म्हणाले
तर हिरालाल पगडाल म्हणाले की, वयाच्या 61 मध्ये अमृतवाहिनी हॉस्पिटल, अमृतवाहिनी शिक्षण संस्था उभी करणाऱ्या दादांनी वयाच्या 75 मध्ये दंडकारण्य अभियानाची चळवळ दिली. सातत्याने समाजासाठी नवीन काहीतरी करणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांचे जीवन हे संघर्षमय राहिले. संगमनेर अकोले तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. 1989 मधील या संघर्षामुळेच 30% पाणी संगमनेर व अकोले तालुक्याला मिळाले. सहकारातून समृद्ध झालेला हा जिल्ह्यातील एकमेव तालुका असून निळवंडे चे पाणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाईल तेव्हा दादांचे स्वप्न पूर्ण होईल असे ते म्हणाले.
डॉ. तांबे म्हणाले सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी समाजचिंतन दूरदृष्टी व समाजाविषयीच्या तळमळीतून तालुक्यात विकासाचा पाया घातला .आणि आज विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा देशासाठी विकासाचे मॉडेल ठरला आहे.
तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की , स्व भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त संगमनेर दूध संघात 2 मेगा वॅट सोलर प्रोजेक्ट सह तालुक्यातील 250 डेअरी मध्ये असलेल्या बल्क्युलरला सोलर योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षस्थानी मा. आ. डॉ. सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर टीडीएफचे राज्यसचिव प्रा .हिरालाल पगडाल, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, अरुण पा. कडू, उद्योजक राजेश मालपाणी, संपतराव डोंगरे ,भाऊसाहेब कुटे ,सुधाकर जोशी ,शंकर पा. खेमनर, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे ,लहान भाऊ गुंजाळ, आर.बी. रहाणे, सुरेश थोरात, संतोष हासे, राजेंद्र चकोर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, उपसभापती नवनाथ आरगडे आदी उपस्थित होते.
यावेळी अमित पंडित, सुहास आहेर, विष्णुपंत रहाटळ, निर्मलाताई गुंजाळ, दत्तात्रय थोरात, प्रा बाबा खरात, केशवराव जाधव, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे ,गणपतराव सांगळे ,अनिल शिंदे, चंद्रकांत कडलग, राजेंद्र कडलग, सुभाष सांगळे , मीनानाथ वरपे,यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS