मुंबई / नगर सहयाद्री - मुंबई मधील बोरीवलीतील कारखान्यातील दहा तोळे सोन्यावर कामगारांनीच डल्ला मारल्याची घटना घडली आहे. सोने घेऊन कामगार पसार...
मुंबई / नगर सहयाद्री -
मुंबई मधील बोरीवलीतील कारखान्यातील दहा तोळे सोन्यावर कामगारांनीच डल्ला मारल्याची घटना घडली आहे. सोने घेऊन कामगार पसार झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना पश्चिम बंगाल मधुन अटक केली आहे. आरोपीने एकूण दहा तोळे सोने चोरुन नेले होते. त्यापैकी चार तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. याबाबतपुढील तपास पोलीस करत आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, बोरीवलीमधील सोन्याच्या कारखान्यातून 28 फेब्रुवारी दहा तोळे सोने घेऊन कामगार फरार झाल्याची घटना घडली. सोने चोरी झाल्याचे कळताच मालकाने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला.चोरी केलेले सोने तो पश्चिम बंगालला घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घटनेचा उलघडा करण्यसाठी कारखान्यात सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले. तांत्रिक विश्लेषनानुसेर आरोपी अहमदाबादमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतरही पोलीस अहमदाबादला पोहोचले.जेथे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी सापडला नाही. आरोपीचे पुन्हा तांत्रिक विश्लेषण केले असता ते ठिकाण हावडा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तात्काळ विमानाने हावडा गाठले.
पोलीस अधिकाऱ्यांनी भेलपुरी वाल्याचा वेश परिधान करत ट्रेनच्या स्लीपर आणि जनरल डब्यांची तपासणी केली. मात्र आरोपी सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी थ्री टियर एसी कोचमध्ये आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी आरोपी तेथे आढळून आले आरोपीहेच आहे. तक्रारदारानेही आरोपीला ओळखले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. यानंतर सोने खरेदी करणाऱ्या खरेदीदारालाही पोलिसांनी अटक केली.
COMMENTS