उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले यांचा नगरी सत्कार सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्या वाळू मिळत नसल्यान...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले यांचा नगरी सत्कार
सुनील चोभे / नगर सह्याद्री -
सध्या वाळू मिळत नसल्याने वाळूचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यातून वाळू माफियांचा नंगानाच सुरु आहे. त्यामुळे आता वाळूचे लिलाव न करता सरकारच्या माध्यमातून वाळू घरपोहोच केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी केली.
सकाळाई योजनेच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डीले यांची निवड झाल्याबद्दल रुईछत्तीशी येथे नगरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंत्री विखे पाटील बोलत होते.
याप्रसंगी आमदार बबनराव पाचपुते, खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले, युवा नेते विक्रम पाचपुते, अक्षय कर्डीले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, दत्ता पानसरे, राहुल शिंदे, आण्णा शेलार, तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, सभापती अभिलाष पाटील घिगे, उपसभापती रेवणनाथ चोभे, दिलीप भलसिंग, हरिभाऊ कर्डीले, संतोष म्हस्के, बाळासाहेब महाडिक यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रास्ताविक केले.
➡️ नगर तालुका बाजार समिती निवडणुकीचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नारळ फुटला : चेअरमन शिवाजी कर्डीले
➡️ नगर तालुक्यात महसूल भवन बांधणार : मंत्री विखे
COMMENTS