अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची पळापळ | गहू, हरभरा, फळबागांचे मोठे नुकसान अहमदनगर | नगर सह्याद्री दोन दिवसांपासून भरून येणारे आभाळ आणि र...
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची पळापळ | गहू, हरभरा, फळबागांचे मोठे नुकसान
अहमदनगर | नगर सह्याद्री
दोन दिवसांपासून भरून येणारे आभाळ आणि रिमझिमने पावसाळी वातावरण निर्माण झाले असताना शनिवारी दुपारनंतर मात्र नगर शहर आणि परिसरात जोरदार गारपीट झाली. दुपारनंतर अचानक सुरु झालेल्या वादळी वार्यासह गारपीट झाली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.
अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. शनिवारी सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. आभाळ दाटून आलेले होते. हवामान खात्याने आणि प्रशासनाने जोरदार पावसाची शक्यता वर्तवून सावधानतेचा इशारा दिला होता. शनिवारी दुपारनंतर ढग साचून आले आणि दीडच्या सुमारास वारा व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्या पाठोपाठ भले मोठे थेंब आणि गारा कोसळू लागल्या. सुरूवतीला गारांचे प्रमाण कमी होते. मात्र काही वेळानंतर वारा आणि पावसाचा जोर वाढल्यांतर गारांचे प्रमाण आणि आकारही वाढला. रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी, दुचाकींनाही या गारांचा चांगलाच फटका बसला.
या पावसामुळे अवघ्या काही वेळातच रस्ते पाण्याखाली गेले. सखल भागात तळी साचली. शहरात नुकताच उड्डाणपूल झाला आहे. गारांच्या तडाख्यातून वाचण्यासाठी वाहनचालक, पादचारी यांनी उड्डाणपुलाच्या खाली आधार घेतला. मात्र अचानक सुरू झालेल्या गारपीटीमुळे घराबाहेर पडलेल्यांची मोठी धावपळ उडाली. गहू, फळबागा या पिकांचे या गारपीटीने मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. दुपारी उशीरापर्यंत पावसाचा तडाखा सुरूच होता. पडलेल्या गारा गोळा करण्यासाठी बालगोपाळ मंडळी रस्त्यावर आणि घराच्या अंगणात आली. विजांचा कडकडाट, मध्येच जोरदार वारे आणि गारांचा पाऊस असे चित्र दुपारी उशीरापर्यंत होते.
अवकाळीने घेतले पाच जणांचे बळी
महाराष्ट्रात दि. २० मार्चपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मराठवाड्यात अवकाळी पावसाचे पाच बळी गेले आहेत.आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शयता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अवकाळी पावसाने हजारो हेटरवरील पिके भूईसपाट झाले आहेत. नुकसानीची माहिती मोबाईलवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.परभणीत अवकाळी पावसाचे ५ बळी गेले आहेत. सोनपेठ तालुयातील शेळगाव हटकर शिवारात वीज पडून ओंकार शिंदे या १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, यात त्याची आई गंभीर भाजली आहे.गुरुवारी सोनपेठ तालुयातील उखळी बुद्रुक येथील नीता सावंत यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तर गंगाखेड तालुयातील उखळी खुर्द येथे शेतात काम करीत असतांना ५ जणांच्या अंगावर वीज कोसळली, यात दोघांचा मृत्यू झालाय तर इतर तिघे जण जखमी असल्याची मिळत आहे.
२४ तारखेनंतर पुन्हा पाऊस
हवामानतत्र पंजाबराव डख यांनी राज्यात २० तारखेपर्यंत राज्यात ठिकठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तविला होता. तसचे राज्यात २२ व २३ तारखेला पुन्हा ढगाळ हवामान राहणार असून २४ तारखेनानंतर राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचे पंजाब डख यांनी सांगितले आहे.
फळबागांचे मोठे नुकसान
कांदा व फळपिकांना बाजार भाव नसल्याने अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वादळी वार्यासह पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच तलाठी संपावर गेल्याने शेतकर्यांचे पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण? असा सवाल शेतकर्यांकडून उपस्थित होत आहे.
COMMENTS