अहमदनगर | नगर सह्याद्री नेवासा तालूयातील शहापुर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांच्या शेतात छापा टाकुन ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नेवासा तालूयातील शहापुर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांच्या शेतात छापा टाकुन पोलीसांनी सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शेतामध्ये बेकायदेशिररित्या गांजा व अफुचे झाडांची लागवड केलेली आहे, अशी माहिती पोलीसांना मिळाली होती.पोलीसांनी प्रथम शहापुर येथील बाबुराव लक्ष्मण साळवे यांच्या शेतात पाहणी केली असता गव्हाच्या शेतामध्ये २.५ फुट उंचीची दोन व घरा समोर ८ फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरासमोर पोत्यावर गांजाच्या झाडाचा पाला काढुन तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसुन आला. आरोपी बाबुराव लक्ष्मण साळवे याच्याकडून १,११,४२०/-रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहेत.देवगांव येथील रावसाहेब भागुजी गिलगिले यांच्या शेतातही अफुच्या झाडांची लागवड केल्याचे दिसुन आल्याने छापा टाकुन पोलीसांनी आरोपी रावसाहेब भागुजी गिलबिले (वय ३८, रा. देवगांव, ता. नेवासा ) याच्या शेतामधुन १३,८४,०००/- रु. किंमतीची ६९.५०० किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी ६२१ अफुची झाडे व बोंडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहेत.
पो.ना.संदीप संजय दरदंले यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.ही कारवाई अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर , उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.गणेश वारुळे, स.फौ.विष्णु घोडेचोर, पो.हे.कॉ.मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पो.ना.शंकर चौधरी, संदीप दरदंले, पो.कॉ.शिवाजी ढाकणे, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे व बबन बेरड यांच्या पथकाने केली.
COMMENTS