अहमदनगर| नगर सह्याद्री- महापालिकेचे सन २०२३-२४ चे १२४० कोटींचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर करण्यात आले. सभापती गणेश (उमेश) कवडे यांच्...
अहमदनगर| नगर सह्याद्री-
महापालिकेचे सन २०२३-२४ चे १२४० कोटींचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर करण्यात आले. सभापती गणेश (उमेश) कवडे यांच्याकडे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी हे अंदाजपत्रक सादर केले.
प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न ४३२ कोटी २१ लाख, भांडवली जमा ७४७ कोटी ०५ लाख अंदाजित आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी ८० कोटी ८० लाख, संकलीत करावर आधारीत करापोटी ७९ कोटी ७० लाख, जीएसटी अनुदान १२० कोटी ६० लाख व इतर महसुली अनुदान १७ कोटी ८५ लाख, गाळा भाडे ३ कोटी ६० लाख, पाणीपट्टी ४२ कोटी ६१ लाख, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी २० कोटी, संकीर्ण ४२ कोटी ३९ लाख आदी तरतुदी आहेत. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरुन ८१८ कोटी ३७ लाख अंदाजित जमा होणार आहेत.
खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर १३८ कोटी ९५ लाख, पेन्शन ४७ कोटी ४४ लाख, पाणी पुरवठा वीज बिल ३५ कोटी, स्ट्रीट लाईट वीज बिल ५ कोटी ५० लाख, शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा ५ कोटी ७२ लाख, महिला व बाल कल्याण योजना ३ कोटी ३४ लाख, अपंग पूनर्वसन योजना ३ कोटी ३४ लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना १० कोटी ०४ लाख, सदस्य मानधन १ कोटी ५० लाख, औषधे व उपकरणे १ कोटी, सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी ८ कोटी ६४ लाख, कचरा संकलन व वाहतूक १ कोटी ५० लाख, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती १ कोटी, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी २ कोटी २० लाख, अशुद्ध पाणी आकार २ कोटी, विविध वाहने खरेदी १ कोटी ५०, नवीन रस्ते १३ कोटी, रस्ते दुरुस्ती ४ कोटी २५ लाख, इमारत दुरुस्ती १ कोटी २५ लाख, शहरातील ओढेनाले साफसफाई ४५ लाख, आपत्कालीन व्यवस्थापन ५० लाख, कोंडवाड्यावरील खर्च २६ लाख, वृक्षारोपन तदनुषंगिक खर्च १ कोटी २५ लाख, हिवताप प्रतिबंधक योजना ४० लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी २१ लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त १ कोटी ५५ लाख, मालमत्ता सर्वेक्षण २० कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प २० लाख, पुतळे बसविणे २ कोटी १० लाख, भविष्य निर्वाह निधी तूट ५ कोटी, बेवारस प्रेत विल्हेवाट ७५ लाख, उद्यान दुरुस्ती ७५ लाख यासह इतर बाबींवर खर्च अपेक्षित आहे.
शहरात नवीन रस्ते व रस्ते दुरुस्तीसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच मुलभूत आरोग्य, वीज, पाणी या सेवा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. शासनाकडून प्राप्त होणार्या विविध कामांसाठी निधीतील मूलभूत सुविधा विकास योजना, दलितेतर वस्ती सुधारणा योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, अल्पसंख्यांक विकास निधी, १५ वा वित्त आयोग, सर्वांसाठी घरे निधी, पाणी पुरवठा निधी, आमदार निधी, खासदार निधी इत्यादीमधील कामे पूर्णत्वास नेणे व नवीन कामांसाठी शासन स्तरावर प्रयत्न करून निधी मिळवून शहराचा चांगल्या प्रकारे विकास करणे. त्याचप्रमाणे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करुन घरपट्टी आकारणी करुन उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकांच्या जागांचा विकास करून त्या माध्यमातून महसूल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शहरातील अपूर्ण अवस्थेतील योजना व विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येऊन शहराचा विकास करणेसाठी महापालिका कटिबध्द आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त डॉ. श्रीनिवास कुरे, मुख्य लेखाधिकारी शैलेश मोरे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदी उपस्थित होते.
COMMENTS