अहमदनगर | नगर सह्याद्री पूर्ववैमनस्यातून तरूणीला माय-लेकाने जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी भिंगार शहरातील खेळवाडी ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
पूर्ववैमनस्यातून तरूणीला माय-लेकाने जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी भिंगार शहरातील खेळवाडी परिसरात साईबाबा मंदिराजवळ घडली. कांचन प्रकाश लोखंडे (वय २५ रा. सावतानगर, पम्पींग स्टेशन, भिंगार) यांनी याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आनंद श्रीनिवास राव, आमला श्रीनिवास राव (दोघे रा. सावतानगर, पम्पींग स्टेशन, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. फिर्यादी यांचे शिक्षण सुरू आहे. त्यांच्या शेजारी आनंद श्रीनिवास राव हे राहतात. त्यांच्यासोबत फिर्यादीचे सहा ते सात महिन्यापूर्वी भांडण झाले होते. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षणासाठी निघाल्या असता खळेवाडी परिसरातील साईबाबा मंदिराजवळ त्यांना आनंद श्रीनिवास राव व आमला श्रीनिवास राव यांनी थांबवले.
जातीवाचक शिवीगाळ करून तु एकटी भेट मग तुला सांगतो, आम्ही चांगल्या चांगल्यांना निट केले आहे. तुला पण पाहतोफ, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर फिर्यादी यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आनंद श्रीनिवास राव व आमला श्रीनिवास राव यांच्याविरूद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे करीत आहेत.
COMMENTS