अहमदनगर | नगर सह्याद्री - सासरी नांदत असताना पतीकडून आपला मानसिक, शारिरीक छळ होत असल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
सासरी नांदत असताना पतीकडून आपला मानसिक, शारिरीक छळ होत असल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तीचा पती साहिल मोहम्मद शाकीर सय्यद याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेने फिर्यादीत म्हटले, की साहिल मोहम्मद शाकीर सय्यद याच्या बरोबर नोंदणी पद्धतीने व मुस्लिम पद्धतीने लग्न झाले आहे. ती तिच्या कुटूंबियासमवेत मुकूंदनगरमध्ये राहत असताना मैत्रीण सुवर्णा जाधव हिला पतीने रात्री, अपरात्री फोन करुन त्रास दिल्याचे सांगितले. त्या संदर्भात विचारणा केली असता पतीने मलाच जीवे मारण्याची धमकी दिली. आपण घाबरुन याची माहिती पोलीसांना दिली. पोलीस आल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. यावेळी पती आणि माझ्यात चर्चा झाली व घरी आल्यानंतर पतीने पुन्हा मला मारण्यासाठी कुर्हाड घेतली.
मी घाबरुन घरात असलेली विषारी औधषाच्या बाटलीतील वीष पिले. माझ्यावर त्याने खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार केले. बरी झाल्यानंतर पतीने मला आत्याकडे पाठविले व कल्पना जाधव नावाच्या महिलेला घरी आणून ठेवले. सध्या तो तिच्यासोबत राहत असून मलाही त्यांच्यासमवेत राहण्याची बळजबरी करत आहे. त्याने मला बोलण्याचा बहाणा करत पवनचक्कीकडे नेत मारहाण करून मला बहिणीकडे सोडून दिले. बहिणीच्या घरी येऊन तो रोज बळजबरीने संबंध ठेवत आहे. अनैसर्गिक कृत्यही करतो, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. यापूर्वी पतीचे दोन महिलांशी विवाह झाले असून त्यातील एक मयत आहे. तो आताही माझ्या घरच्यांना जातीवाचक शिवीगाळ करतो, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS