अहमदनगर | नगर सह्याद्री - जामखेड तालुक्यातील नान्नज शिवारातुन गावठी कट्टा व काडतुसे बाळगल्याप्रकरणी पोलीसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
जामखेड तालुक्यातील नान्नज शिवारातुन गावठी कट्टा व काडतुसे बाळगल्याप्रकरणी पोलीसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून याबाबत माहिती मिळाली होती. गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारे दोन इसम नान्नज शिवारातील नंदादेवी हायस्कुलयेथे येणार होते. त्यामुळे त्यांनी पथक तयार करुन सापळा लावला. जामखेड-नान्नज रोडवरील, नान्नज शिवारातील नंदादेवी हायस्कुल येथे सापळा लावुन थांबलेले असतांना दोन इसम संशयितरित्या फिरताना दिसले. आरोपिंनाही पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले.
त्यांचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांनी त्यांची नावे हरीष ऊर्फ हरीनाथ सुबराव बिरंगळ (वय ४२, रा. सोनेगांव, ता. जामखेड) महेंद्र अभिमान मोहळकर, (वय ३८, रा. नान्नज, ता. जामखेड) असे असल्याचे सांगीतले. त्यांची झडती घेतली असता हरीष बिरगंळ याच्याजवळ एक गावठी बनावटीचा कट्टा व महेंद्र मोहळकर याच्याकडे चार जिवंत काडतूस आढळले. त्याची किंमत ३१,२०० रुपये आहे.आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी महेंद्र अभिमान मोहळकर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांच्याविरुध्द यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी व गंभीर स्वरुपाची दुखापत करणे असे एकुण ५ गुन्हे दाखल आहेत. आरोपी हरीष ऊर्फ हरिनाथ सुबराव बिरगंळ हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द यापुर्वी गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे.कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे , व उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.स.ई. सोपान गोरे, पो.हे.कॉ.विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पो.ना.शंकर चौधरी, भिमराज खर्से, पो.कॉ.विनोद मासाळकर, योगेश सातपुते, संभाजी कोतकर व भरत बुधवंत यांनी केली.
COMMENTS