अग्निशामक दलाच्या 3 ते 4 गाड्या पोहचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री - छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीची मोठी ...
अग्निशामक दलाच्या 3 ते 4 गाड्या पोहचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री -
छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीची मोठी घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. शहरातील प्रोझोन मॉल समोरील केबलच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर पोहचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दुकानाला ही आग लागली आहे. आगीमुळे दुकानील भरपूर साहित्य जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
COMMENTS