मुंबई। नगर सहयाद्री - महाराष्ट्रात धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे कालातराने वाढत असल्याचे जाणवत आहे, लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये निघणा...
मुंबई। नगर सहयाद्री -
महाराष्ट्रात धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे कालातराने वाढत असल्याचे जाणवत आहे, लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये निघणारे मोर्चे केवळ बहुसंख्याकांची मागणी आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात अर्थ नाही. ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे. या संदर्भातील कायद्यांचा अभ्यास केला जात आहे” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, समाजातील मुलीला न्याय मिळाला पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे. ‘लव्ह जिहाद’च्या घटनांची प्रकरणे रोखण्यासाठी नवा कायदा करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे,’ असे फडणवीस यांनी भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या लक्षवेधीस उत्तर देताना सांगितले. या लक्षवेधीवर भाजप सदस्य प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे आदींनी विविध घटनांची माहिती देऊन कायदा करण्याची मागणी केली आहे.
परंतु नव्या कायद्याच्या आग्रहातून वेगळा सूर ध्वनित होत आहे,’ असे काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी सांगितले. ठाकरे गटाच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी ‘लव्ह जिहाद’ची व्याख्या काय, असा प्रश्न केला; तसेच सर्वच महिलांना संरक्षणाची गरज असल्याचे सांगितले. राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीवर ठाकरे गटाचे अनिल परब यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
COMMENTS