छत्रपती संभाजीनगर/ नगर सहयाद्री - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालूक्यामधील वांगी खुर्द या गावातील ही ह्रदद्रावक घटना घडली आहे. घरा...
छत्रपती संभाजीनगर/ नगर सहयाद्री -
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालूक्यामधील वांगी खुर्द या गावातील ही ह्रदद्रावक घटना घडली आहे. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच हळदीच्या आदल्या दिवशी अंघोळीला गेलेल्या भावी नववधूचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळ-हळ होत आहे.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वांगी खुर्द गावातील रोहिणी उर्फ पल्लवी भगवान जाधव या तरुणीच्या लग्नाची घरात तयारी सुरू होती. दोन दिवसानीं लग्न असल्याने पत्रिका वाटल्या बस्ता बांधण्याचा कार्यक्रमही झाला. मात्र एकीकडे लग्नाची लगबग सुरु असतानाच अंघोळीला गेलेल्या 18 वर्षीय भावीवधूचा पाणी घेताना हिटरचा शॉक लागला. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
या दुखःद आणि दुर्देवी घटनेने संपूर्ण कुटूंबावर शोककळा पसरली. ज्या घरात नवरदेवाची वरात येणार होती, त्याच घरात भावी नवरीची अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
COMMENTS