पारनेर | नगर सह्याद्री महाराष्ट्रामध्ये कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची अंतिम यादी सोमवारी (दि. २० मार...
पारनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्रामध्ये कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची अंतिम यादी सोमवारी (दि. २० मार्च) जाहीर झाली. १८ जागांच्या निवडणुकीसाठी ३ हजार १३३ मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
सोमवारी दि २० मार्च रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार सहकार विभागाच्या वतीने अंतिम यादी जाहीर करण्यात आली. दुसरीकडे ज्या शेतकर्याच्या नावाने सातबारा असेल त्या शेतकर्याला या बाजार समितीचे निवडणुकीमध्ये निवडणूक लढवता येणार असून त्याला या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मात्र राहणार नाही. त्यामुळे शासनाने शेतकर्यांसाठी हा पहिल्यांदाच निर्णय घेतला असल्याने अनेक इच्छुक जरी ग्रामपंचायत सदस्य अथवा सेवा संस्थेचे संचालक नसले तरी सर्वसामान्य शेतकरी सातबारा उताराच्या जोरावर ते निवडणूक रिंगणात उतरू शकतात.
त्यामुळे या बाजार समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणार्या सर्व पक्षीय उमेदवारांच्या अंतिम यादीकडे नजर असून यादी जाहीर होताच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी लवकर निवडणूक जाहीर होण्याची शयता पण व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी अगोदर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून सर्वपक्षीय या निवडणुकीत उतरणार आहेत.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जवळपास जाहीर झाली असून या निवडणुकीत १८ जागांसाठी ३ हजार १३३ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सेवा संस्था मतदार संघातील ११ जागांसाठी १ हजार १३३ तर ग्रामपंचायत मतदार संघातील ४ जागांसाठी १ हजार ५२ व्यापारी मतदारसंघातील २ जागांसाठी ७६ तर हमाल मापाडी व तोलाई मतदारसंघातील १ जागा साठी १६२ मतदारांना मतदान करणार आहेत तर दुसरीकडे या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकर्यांना निवडणूकीसाठी उभे राहता येत असल्याने अनेक जण आपले नशीब पण या निवडणुकीत आजमावू शकतात असे सचिव सुरेश आढाव यांनी सांगितले.
COMMENTS