मुंबई /नगर सह्याद्री- भारतातील SBI, HDFC आणि ICICI अशा तीन बँका आहेत, ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या आहेत या बँका बुडणे केंद...
मुंबई /नगर सह्याद्री-
भारतातील SBI, HDFC आणि ICICI अशा तीन बँका आहेत, ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या आहेत या बँका बुडणे केंद्र सरकारला परवडणारे नाही. रिजर्व बँक या बँकांना D-SIB यादीत ठेवते आणि त्यांच्यासाठी कठोर नियम बनवले आहेत.
आपली बँक कधी बुडाली तर आपल्या पैशाचे काय होईल, अशी भीती लोकांना वाटते, असे झाल्यास सरकार पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. पण या इतक्या मोठ्या आहेत की, त्या बुडूच शकत नाहीत.अरबीआयने ICICI बँक, SBI आणि HDFC बँकेचा D-SIB मध्ये समावेश केला आहे.
डी-एसआयबी ही तांत्रिकदृष्ट्या देशांतर्गत प्रणालीतील महत्त्वाची बँक असते.ज्या बँका देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असतात त्या बुडणे सरकारला परवडणारे नाही. त्यांच्या बुडण्याने देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत होऊ शकते.२००८ च्या मंदीनंतर बँकांना डी-एसआयबी म्हणून घोषित करण्याची पद्धत सुरू झाली. त्यानंतर अनेक देशांच्या अनेक मोठ्या बँका बुडाल्या,पण या बँक कधी बुडणार नाहीत याच बँकात तुमचे खाते किंवा ठेव राहू द्या.
COMMENTS