नगर -नगर सह्याद्री केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांनो पहिल्यांदा 'जात' दाखवा मगच रासायनिक खतं घ्या या तुघलकी फतव्याने शेतकऱ्यामध्ये सं...
नगर -नगर सह्याद्री
केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांनो पहिल्यांदा 'जात' दाखवा मगच रासायनिक खतं घ्या या तुघलकी फतव्याने शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. राजकारण्यांकडून जात संपवण्याच्या गप्पा मारल्या जात असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जाती गोळा करण्याचा उद्योग सुरु केला आहे .
दुकानदार जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यात 6 मार्चपासून जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे.पॉस मशीन ही यंत्रणा केंद्र शासनाच्या खत मंत्रालयामार्फत चालविली जाते. त्यामुळे कृषी विभागात देखील या प्रकाराबाबत काही माहिती नाही . शेतकऱ्यांची जात गोळा करुन नव्या चक्रव्यूहात अडकवण्याचा उद्योग तर नाही ना? अशी शंका उपस्थित झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशीन या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पद्धतीचे अपडेटस् आले आहेत. खत घेताना दुकानदारांकडून जातीची विचारणा होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.शेतकर्यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, खत गोण्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्यांना अंगठा घेऊन खत दिले जाते.तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशीन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यासाठी शेतकर्यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे.यामुळे शेतकरी आणि खत दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रकार देखील घडत आहेत .सरकार आणि कृषी विभागाच्या कारभारावर शेतकरी संताप व्यक्त करत आहेत .
COMMENTS