पारनेर | नगर सह्याद्री काटकसरीने प्रपंच कसा केला पाहिजे याचे आदर्श उदाहरण महिला वर्ग असुन महिलांना काटकसरव बचतीची सवय असल्याने प्रपंचासाठी ...
पारनेर | नगर सह्याद्री
काटकसरीने प्रपंच कसा केला पाहिजे याचे आदर्श उदाहरण महिला वर्ग असुन महिलांना काटकसरव बचतीची सवय असल्याने प्रपंचासाठी त्यांचा मोठा आर्थिक हातभार लागतोअसेे, मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत निघोज येथे आ. नीलेश लंके यांचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर नवी मुंबई स्थित पिंपळगांरोठाच्या बचत गटाच्या महिलांनी मुंबईत आकाशवाणी येथील आमदार निवास येथे आ. नीलेश लंके यांचा वाढदिवस साजरा केला. बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आ. लंके यांनी यावेळी दिले.
आ. नीलेश लंके महिला कल्याणकारी संस्था पुरस्कृत महिला बचत गटांची नवी मुंबई येथेही स्थापना करण्यात आली आहे. या गटांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून त्याची माहीती यावेळी आ. लंके यांना देण्यात आली. निलेश लंके महिला प्रतिष्ठाणच्या खजिनदार श्रीमती चौगुले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करणे, त्यांच्या अडीअडचणी समजाऊन घेऊन मदत करणे, महिलांच्या सर्वांगिण विकासास पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन तसेच यशस्वी महिला उद्योजकांच्या माध्यमातून कौशल्य गुण विकसित करणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन रोजगार व उद्योग निर्मिती करण्याबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे नमुद केले. महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे, त्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्राचे सहकार्य मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
महिला बचत गटाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर सकारात्मक विचार करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आ. लंके यांनी यावेळी दिले. यावेळी केक कापून आ. लंके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वैष्णवी माता बचत गट, वीर जिजामात बचत गट, कुलस्वामिनी बचत गट, महालक्ष्मी बचत गट, महाराणी लक्ष्मीबाई बचत गट, सरस्वती बचत गट, म्हाळसादेवी बचत गट या बचत गटाच्या महिला सदस्य यावेळी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अशोक घुले, कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा शालिनीताई घुले, अमोल घुले हे देखील यावेळी उपस्थित होते.
COMMENTS