मुंबई/नगर सह्याद्री- खासदार नवनीत राणा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सगळ्यांना माहित आहे अनेक वेळा राणा या पातळी सोडून बोल...
मुंबई/नगर सह्याद्री-
खासदार नवनीत राणा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सगळ्यांना माहित आहे अनेक वेळा राणा या पातळी सोडून बोलत असतात आताही त्यांनी ठाकरे यांच्यावर अशीच टीका केली आहे. ठाकरे यांनी बंड झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता . त्यावरच राणा यांनी ठाकरे हे पळपुटे असून जबाबदारी सोडून पळून जाणारा व्यक्ती असल्याचे म्हटले आहे .
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदेंना दिलं आहे. जर, निवडणूक आयोग न्याय देऊ शकते, तर सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल.ठाकरेंनी घाबरून मुख्यमंत्रीपद सोडलं. ज्या आमदार आणि पक्षांनी त्या पदावर बसवलं. ते पद तुम्ही घाबरून सोडलं. त्यामुळे बाकी आमदारांनी घेतलेला निर्णय योग्यच वाटतं. ती व्यक्ती किती कमजोर आहे, हे निवडणूक आयोगाला समजलं. न्यायालयाचाही याच पद्धतीने निर्णय येईल , असा विश्वास आहे, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
COMMENTS