पारनेर | नगर सह्याद्री- प्रतिनिधी: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालयाच...
पारनेर | नगर सह्याद्री-
प्रतिनिधी: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालयाच्या परिसरातील वृक्षांना क्यू आर कोडींग करण्यात आलेले आहे.
क्यू आर. कोडींगच्या माध्यमातून वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना एका लिकवर मिळणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी दिली आहे.
या माहितीमध्ये वनस्पतींचे स्थानिक व शास्रीय नाव आणि उपयोग फोटोसह उपलब्ध होते. असा नाविन्यपूर्ण उपक्रम पारनेर महाविद्यालयामधील वनस्पतीशास्र विभागाने राबविला आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थी,पालक व महाविद्यालयीन कर्मचारी विविध वनस्पतींची माहिती घेत आहेत. या उपक्रमाद्वारे वनस्पतीशास्र विभागाने महाविद्यालय परिसरातील एकूण ३७५ वृक्षांना यू. आर. कोडींग करण्यात आले आहे. यामध्ये विविध वनस्पतींचा समावेश आहे.पारनेर महाविद्यालयाच्या परिसरातील रगतुरा, पळस, शेंदरी, कडुलिंब, शिवण, अडुळसा, बेल, अर्जून, साग, वड, पिंपळ, उंबर, रॉयल पाम, डेट पाम, बहावा, भोकर, सप्तपर्णी, बकुळी, निलगिरी, नीलमोहर, गुलमोहर, आंबा, सायकस, झामिया, मोरपंखी, बॉटलब्रश, अशोक, हिरवाचाफा, आवळा, फुलझाडे, फळझाडे, इत्यादी.
वनस्पतीशास्र विभागातील प्रा.भारत चौधरी यांनी यू आर कोड तयार केले व यू आर कोड तयार करण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.या उपक्रमाचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व संस्थेचे सदस्य राहुल झावरे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर व उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. दिलीप ठुबे, विभागप्रमुख डॉ. रविंद्र देशमुख यांनी कौतुक केले.
COMMENTS