अहमदनगर | नगर सह्याद्री वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्याही वाढत आहे, शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे आवश्यक झाले आहे. वाहतुक शाखेच्यावती...
अहमदनगर | नगर सह्याद्री
वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्याही वाढत आहे, शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे आवश्यक झाले आहे. वाहतुक शाखेच्यावतीने यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नूतन पोलिस निरिक्षक मोरेश्वर तैनदान यांनी विविध ठिकाणीच्या सेवा काळात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. नगरमध्येही अशाच स्वरुपाचे काम करुन वाहतुकी कोंडीबरोबर रिक्षा पंचायतीसह विविध संघटनांच्या प्रश्नात लक्ष घालून सोडवतील, असा विश्वास जिल्हा रिक्षा पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
जिल्हा रिक्षा पंचायतच्यावतीने शहर वाहतुक शाखेच्या पोलिस निरिक्षकपदी मोरेश्वर एल. तैनदान यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, नंदू डहाणे, विलास कराळे, दत्ता वामन, अशोक औशिकर, लतिफ शेख, संपत दळवी, दिलीप गायकवाड, शब्बीर शेख, भोला शिंदे, राज पाचारणे, बाबा सत्रे, सागर काजवे, अनिल चाबुकस्वार, पोपट चौधरी व रिक्षा पंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पो.नि.मोरेश्वर तैनदान यांच्या समवेत शहरातील रिक्षा थांब्यांबाबत चचाऱ् करण्यात आली. कापड बाजार, दिल्लीगेट, मेहतर कॉलनी आदिसह नवीन थांबे तयार करण्यात यावी, अशी मागणी रिक्षा पंचायतच्या पदाधिकार्यांनी केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत संयुक्तरित्या यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिले.
COMMENTS