नाशिक /नगर सह्याद्री - राज्यातील लाखो कर्मचारी हे जुन्या पेन्शनसाठी संपावर गेले आहेत. त्यात आरोग्य कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. त्यामुळ...
नाशिक /नगर सह्याद्री-
राज्यातील लाखो कर्मचारी हे जुन्या पेन्शनसाठी संपावर गेले आहेत. त्यात आरोग्य कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडून गेली आहे. संपाचा चौथा दिवस असून आरोग्य यंत्रणा रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे संप सुरू आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य लोकांचा मात्र उपचाराअभावी जीव जातोय . नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या काही फुटावर बेवारस मृतदेह पडलेला आढळला असून त्याला उचलण्यासाठी देखील जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी पुढे आलेले नाहीत. मानव जातीलाच काळिमा फासणारी हि घटना घडली आहे. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे दृश्य मनाला विचलित करणारे आहे.पण त्याचे कर्मचाऱ्याला काहीच वाटलेले नाही . नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर काही रुग्ण देखील उपचाराविना पडून आहेत. या रुग्णांकडे आणि मृत व्यक्तींकडे रुग्णालयातील कर्मचारी ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. रुग्णांची सेवा खंडित होऊ देऊ नका, अशी मागणी देखील या वेळेला काही रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.महत्त्वाचे अनेक उपचार होत नाहीत , कुणाचे ऑपरेशन रखडलंय तर कुणाच्या तपासण्या. त्यामुळे लवकरात लवकर हा संप मिटवून आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा सेवा सुरळीत करावी अशा स्वरूपाची मागणी हतबल झालेले रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्ण नाशिकमध्ये करू लागले आहेत .
COMMENTS