कानपूर/ नगर सह्याद्री - उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ग्वालटोली भागात एका मुलीच्या छातीवर ब्लेडने स्वतःचे नाव कोरून तिच्यावर अत्याचार केले...
कानपूर/ नगर सह्याद्री-
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ग्वालटोली भागात एका मुलीच्या छातीवर ब्लेडने स्वतःचे नाव कोरून तिच्यावर अत्याचार केले व तिच्याकडून साडेदहा लाख रुपये ब्लॅकमेल करून उकळल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. हि मुलगी आठवीत शिकत होती. तिच्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्यावर अत्याचार केले. ब्लेडने तिच्या छातीवर आपलं नाव लिहित जर घरून पैसे आणून दिले नाही तर ब्लेडने तिचा गळा कापेल अशी धमकी दिली. त्याचबरोबर अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा भीतीही घातली.धमकीमुळे अल्पवयीन मुलगी घाबरून गेली. वडिलांनी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी साडे दहा लाख रुपयांची रक्कम जमा करून ठेवली हीती. तिने घरातून साडे दहा लाख रुपये हळूहळू करत महिन्याच्या आत आरोपीला दिले. कपाटात पैसे नसल्याचे पाहून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीला विचारल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला.मुलीने घडला प्रकार सांगितल्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अमन नावाच्या मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर अत्याचार केले. पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. सध्या अमन फरार असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी टीम तयार केली आहे.
COMMENTS