सुपा | नगर सह्याद्री गेल्या पाच दिवसापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पुकारलेल्या बेमुदत बंद मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुक...
सुपा | नगर सह्याद्री
गेल्या पाच दिवसापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पुकारलेल्या बेमुदत बंद मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी सुपा ग्रामपंचायतीने मंगळवार पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शाळेची घंटा वाजणार आहे.
शिक्षकांच्या आंदोलनामुळे बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यार्थीच्या हिताचा विचार पाहून त्या चालू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्या अनुषगाने शनिवारी सुपा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनिषा योगेश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी या बैठकीला हजेरी लावली. सोमवारी पालकां बरोबर चर्चा करुन मंगळवारपासुन नियमित शाळा चालू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
गेले पाच दिवसापासून शिक्षकांसह शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना चालू करावी या मागणीसाठी संपावर गेले आहेत. खाजगी शाळा चालू असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीचे नुकसान होत आसल्याने ते टाळण्यासाठी हिवरे बाजारनंतर पारनेर तालुयातील सुपा ग्रामपंचायत ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणारी पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे. विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त शिक्षक तसे डिएड, बीएडचे मुले अध्यापन करणार आहेत.
सरपंच मनिषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस उपसरपंच विजय पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार,पवारवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाढवणे, गोरख जाधव, उद्योजक योगेश रोकडे, अमित भोसले, राहूल पवार, विजय पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान सुपा ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने तालुयातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
सुप्यातील पाच शाळा होणार सुरू!
सोमवारी पालक व ग्रामस्थ यांची सभा बोलवण्यात आली आहे. सुपा शहरालगत असलेल्या सुपा गावठाण, जाभूळवाडी शाळा, कोल्हे वस्ती शाळा, पवारवाडी शाळा व डोंगरवाडी शाळा अशा पाच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सेवानिवृत्त शिक्षक डिएड बीएडचे मुले यांची सुमारे २५ जणांची टीम तयार करण्यात आली आहे. हे शिक्षक मुलांना अध्यापन करतील. मंगळवार पासून शाळा नियमित सुरू करणार आहोत.
मनिषा योगेश रोकडे, सरपंच सुपा
COMMENTS