सुपा | नगर सह्याद्री सुपा पोलिस स्टेशनने सन २०२२ साली एकून गुन्ह्याच्या ८५ % गुन्ह्यांचा तपास लावला असल्याने विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. ...
सुपा पोलिस स्टेशनने सन २०२२ साली एकून गुन्ह्याच्या ८५ % गुन्ह्यांचा तपास लावला असल्याने विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन प्रथम क्रमांक आल्याबद्दल पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांचा सन्मान करण्यात आला.
सुपा पोलिस स्टेशनचे तात्कालीन पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांनी जिल्हा पोलिस अधिकारी, विभागीय पोलिस अधिकारी या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ या वर्षात एकून दाखल ४६२ गुन्ह्यांपैकी तब्बल ३९४ एवढे गुन्हे निर्गती केले असुन हे प्रमाण सुमारे ८५ % टक्के आहे. अहमदनगर जिल्ह्यात हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.शेखर पाटील यांनी सुपा पोलिस स्टेशनला प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानीत केले आहे. पोलिस स्टेशनच्या या यशात तात्कालिन पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, विद्यमान पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचा सिंहाचा वाटा आहे. या कामी त्यांना पोलीस उपनिरीक्षक, तुळशीराम पवार, अख्तर पठाण, सहाय्यक फौजदार पोलीस हवालदार मरकड, अमोल धामणे, खंडेराव शिंदे, रमेश शिंदे, रियाज पटेल, संदीप चौधरी, ओहोळ दादा, पोलीस नाईक यशवंत ठोंबरेंसह पोलिस कर्मचार्यांची मोठी मदत झाली आहे. सुपा पोलिस स्टेशन हद्दीत ३० कि. मी. चा अहमदनगर पुणे महामार्ग, दोन औद्योगिक वसाहती व सुपा शहरासह २८ ते ३० गावांचा सामावेश आहे. औद्योगिक वसाहतीमुळे सुपा शहरात देशभरातील विविध जाती धर्माचे कामगार येथे राहतात. त्यात वसाहतीत सघर्ष व महामार्गावरील विविध प्रकरणे पहाता सुपा पोलिस स्टेशन संवेदनाशील पोलिस स्टेशन म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी गोकावे व त्यांच्या सहकार्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गुन्हेगारीवर अंकुश ठेवला. त्यांच्या या कार्याची दखल घेत वरिष्ठ आधिकार्यानी सुपा पोलिस स्टेशनला सन्मानीत केले आहे.
COMMENTS