अहमदनगर | नगर सह्याद्री महिलांनी व विद्यार्थिनींनी जीवनात येणार्या संकटाचा जिद्दीने सामना करावा.ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयो...
अहमदनगर | नगर सह्याद्री
महिलांनी व विद्यार्थिनींनी जीवनात येणार्या संकटाचा जिद्दीने सामना करावा.ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातलं बळ कमी होऊ देऊ नका.कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटावा. आत्मनिर्भर बना, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
अहमदनगर महाविद्यालय येथे कोतवाली पोलिस ठाणे, अहदनगर आणि वुमन्स सेल, अहमदनगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री सुरक्षितता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव मुख्य अतिथी आणि व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना चदद्रशेखर यादव म्हणाले की, मुलींनी आपल्यावर अन्याय होत असेल तर निःसंकोचपणे पोलिसांची मदत घ्यावी, आपल्या अडीअडचणी आपले पालक, शिक्षक आणि गरज पडल्यास पोलिसांना कळवाव्यात.जेणेकरून योग्य वेळेत अचूक ती पावले उचलता येतील. पोलिस खाते आपल्यासाठी समर्थपणे उभे आहे असा विश्वास माननीय पोलिस निरीक्षक श्रीयुत चंद्रशेखर यादव यांनी दिला.
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऐशवर्या सागडे यांनी केले. व्याख्यानाच्या आयोजनासाठी प्रा. माया उंडे, प्रा. ऋचा शर्मा, प्रा. पवनजीत छाब्रा यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस, उपप्राचार्य डॉ. रझ्झाक सय्यद, डॉ. नोएल पारगे, डॉ. प्रितम बेदरकर, रजिस्ट्रार दिपक आल्हाट यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्याने उपस्थित होत
COMMENTS