जुन्या पेन्शनसाठी लाल वादळ घोंगावले

अहमदनगर /नगर सह्याद्री  - शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करुन मुंबईला निघालेले शेतकर्‍यांचे वादळ शमलं, मात्र जुनी पेन्शनसाठी सुरु असलेल्या आंद...


अहमदनगर /नगर सह्याद्री 

- शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करुन मुंबईला निघालेले शेतकर्‍यांचे वादळ शमलं, मात्र जुनी पेन्शनसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर शहरातून सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर व परिचारिकांचे लाल वादळ घोंगावले. सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संपाच्या सातव्या दिवशी सोमवारी (दि.20 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल घेऊन मोर्चा काढण्यात आला. किसान सभेच्या पदाधिकार्‍यांनी या संपास पाठिंबा देऊन, मोर्चात सहभाग नोंदवला.  

सावेडी येथील तहसिल कार्यालय येथे सर्व शिक्षक, कर्मचारी एकवटून मोर्चाला सुरुवात केली. हातात लाल झेंडे, गळ्यात लाल उपरणं व डोक्यावर लाल टोप्या घालून कर्मचारी वर्ग तर महिला लाल साड्या व ड्रेस परिधान करुन या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्च्याच्या अग्रभागी धगधगती मशाल होती. एकच मिशन... जुनी पेन्शन! च्या जोरदार घोषणा देत रणरणत्या उन्हात प्रोफेसर चौक, गुलमोहर रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे धरणे आंदोलनात रुपांतर होऊन यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

या मोर्चा व आंदोलनात समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, किसान सभेचे कॉ. बन्सी सातपुते, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, विनायक देशमुख, कॉ. महेबूब सय्यद, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरिष टेकाडे, खाजगी प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरूमुडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बापू तांबे, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, राज्य परिचारिका संघटनेच्या सुरेखा आंधळे, महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेचे संतोष कानडे, भाऊसाहेब डमाळे, भाऊसाहेब थोटे, सयाजीराव वाव्हळ, पुरुषोत्तम आडेप, नंदकुमार हंबरडे, फिरोज शेख, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, विजय काकडे, धनंजय म्हस्के, नाना गाढवे, कल्याण ठोंबरे, अशोक आव्हाड, सुशील नन्नवरे, सचिन कोटमे, शिक्षकेतर संघटनेचे भानुदास दळवी, गोवर्धन पांडुळे आदी सहभागी झाले होते. 

प्रारंभी शेतकर्‍यांच्या लाँग मार्चमध्ये हुतात्मा झालेले पुंडलिक जाधव यांना श्रध्दांजली वाहून आंदोलन सुरु करण्यात आले. संपा विरोधात भूमिका घेणारे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधाचा ठराव समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे यांनी मांडला. यावेळी आंदोलकांना संजय गायकवाड शेम शेम... च्या घोषणा दिल्या. तर निमसे यांनी शेतकरी, कर्मचारी, कामगार एकजुटीचा निर्धाराने संप यशस्वी होणार असल्याची भावना व्यक्त केली. 

कॉ. बन्सी सातपुते म्हणाले की, कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या विरोधातील सरकार सत्तेवर आहे. सर्व शेतकर्‍यांचीच पोर आंदोलनात उतरलेली असून, या आंदोलनास किसान सभेचा पाठिंबा आहे. सरकारने उपकाराची भाषा करू नये, राज्यघटनेने दिलेला पेन्शनचा अधिकार हा त्यांचा हक्क आहे. त्यांना तो मिळाला पाहिजे. 

 कॉ. महेबूब सय्यद म्हणाले की, जाती-धर्माच्या नावाने समाजात फूट पाडून, राजकीय पोळी भाजण्याचे काम सरकार करत आहे. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत कर्मचार्‍यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार आपली जबाबदारी झटकून जुनी पेन्शन नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 अविनाश घुले म्हणाले की, जुनी पेन्शनची मागणी सर्वांच्या हक्काची आहे. ताटातून ओढून घेण्याची सरकारची प्रवृत्ती झाली आहे. कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन नाकारली जात असून, कामगार कायदे मोडीत काढण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. कायम नोकरीचा विषय राहिलेला नाही, युवकांना पॅकेज सिस्टीमने नोकरी देऊन कंत्राटीकरणाचे धोरण राबविले जात आहे. सरकार कामगार विरोधी व भांडवलदारांच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला .

COMMENTS

Name

Accident,139,accident bharat,1,accidentbharat,2,ahmadnage,76,Ahmednagar,8012,Akole,23,BEED,2,bharat,3,bhavishya ahmednagar,2,braking,780,Breaking,5924,Business,9,corona,622,court bharat,2,Cricket,2,cricket bharat,3,Crime,1953,CRIME AHMEDNAGAR,6,crime buldhana maharastra,1,crime jalgaon maharastra,1,crime jalna maharastra,1,crime maharastra,18,crime nashik,1,e,2,economics,11,Editorial,31,education,162,educational maharastra,2,Entertainment,1590,Epaper,29,Health,469,indan,13,India,1426,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,krishi maharastra,2,krushi ahmednagar,2,KRUSHI MAHARASTRA,2,krushi solapur,1,loni,30,m,1,ma,2,Maharashtra,6172,maharastra,49,manoranjan,58,Mumbai,502,Nagar,291,nashik,2,nature maharastra,1,Newasa,67,Parner,3299,Parner Ahmednagar,127,Parner Ahmednagar,2,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,21,Politics,1869,politics ahmednaga,1,politics ahmednagar,15,politics bharat,3,politics maharastra,9,pune,7,Rahata,45,Rahuri,20,SadPadsad,20,sampadkiy,100,Sangamner,181,Saripath,46,Shevgaon,16,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,160,Shrirampur,10,social maharastra,3,Sport,282,sports,61,weather,34,World,226,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: जुन्या पेन्शनसाठी लाल वादळ घोंगावले
जुन्या पेन्शनसाठी लाल वादळ घोंगावले
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/03/-Red-storm%20for-old-pension.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/03/-Red-storm%20for-old-pension.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content