पाटना नगर सह्याद्री भारतातल्या काही भागांमध्ये रेल्वे स्टेशन वर जाहीरात सुरु असताना अचानक पॉर्न क्लिप चालू झाल्याचे प्रकार याआधी घडले आहेत....
पाटना नगर सह्याद्री
भारतातल्या काही भागांमध्ये रेल्वे स्टेशन वर जाहीरात सुरु असताना अचानक पॉर्न क्लिप चालू झाल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. असाच प्रकार बिहारच्या पाटना रेल्वे स्टेशनवर रविवारी सकाळी च्या सुमारास घडला.
पाटना रेल्वे स्टेशनवर टीव्हीची मोठी स्क्रीन लावली आहे. तिथे जाहीरातीच्या जागी अचानक पॉर्न क्लिप सुरु झाली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांना मोठा धक्का बसला.प्रवाशांनी लगेच या प्रकाराची रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडे सुद्धा तक्रार दिली. जवळपास 3 मिनिट मोठ्या टीव्ही स्क्रीनवर ही पॉर्न क्लिप सुरु होती. रेल्वे पोलिसांनी यायला वेळ लावला.
त्यानंतर पोलिसांनी दत्ता कम्युनिकेशनशी संपर्क साधला. या एजन्सीकडे स्क्रीनवर जाहीराती दाखवण्याची जबाबदारी आहे. त्यांनी एजन्सीच्या ऑपरेटर्सना पॉर्न क्लीप बंद करण्याची सूचना केली.यावेळी रेल्वे स्टेशनवर महिला आणि मुलं देखील होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी नंतर कारवाई केली. त्यांनी दत्ता कम्युनिकेशन विरोधात फिर्याद नोंदवली. रेल्वेने या एजन्सीला ब्लॅकलिस्ट केलं व दंड आकारला.
COMMENTS