अहमदनगर | नगर सह्याद्री अल्पावधीतच हॉस्पिटलच्या नेत्र विभागाने रुग्णांचा विश्वास संपादन करत अनेक गरजू रुग्णांवर येथे उपचार होत असल्याने महार...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अल्पावधीतच हॉस्पिटलच्या नेत्र विभागाने रुग्णांचा विश्वास संपादन करत अनेक गरजू रुग्णांवर येथे उपचार होत असल्याने महाराष्ट्रातून येथे रुग्ण येतात. शिबीराच्या माध्यमातून दृष्टी नसलेल्या रुग्णांवर उपचार करुन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यात येत आहे. अशा मोफत शिबीराचा रुग्णांना मोठा आधार वाटत असल्याचे प्रतिपादन स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी केले.
जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आनंदऋषी हॉस्पिटल आयोजित स्वर्गीय पद्माबाई व सजनराजजी मुथा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुथा परिवार प्रायोजित मोफत नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन स्नेहालयचे संस्थापक गिरीश कुलकर्णी व अध्यक्ष संजय गुगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सतीश मुथा, संगीता मुथा, स्वप्निल मुथा, रौनक मुथा, कोमल मुथा, मनाली मुथा, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंगवी, डॉ. अशोक महाडिक, डॉ.वसंत कटारिया, डॉ. अजिंय बंडगर, डॉ. कुशल शहा, डॉ. संदीप राणे, डॉ. प्रतीक कटारिया, डॉ. विशाल तांबे, डॉ. कौस्तुभ घोडके, डॉ. नेहा भराडिया, डॉ. किरण शिंदे, डॉ. आदित्य नाकाडे, डॉ. कृतिका रेवणवार, डॉ. पियुष सोमानी, डॉ. सचिन कसबे, डॉ. विजय दगडे, डॉ. थोपटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आनंद छाजेड, बाबुशेठ लोढा, संतोष बोथरा आदि उपस्थित होते.
प्रायोजक सतीश मुथा म्हणाले, आज हॉस्पिटलच्या माध्यमातून शिबीरे आयोजित केली जात आहेत, त्याचा अनेकांना लाभ होत आहे. या सेवा कार्यात आमचाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने आम्ही सहभाग देत आहोत. डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये जे सेवा कार्य चालते ते कौतुकास्पद आहे. रुग्णसेवा ईश्वर सेवा मानून दिवसेंदिवस महाग होत चाललेली आरोग्य सेवा शिबीराच्या माध्यमातून सवलतीत गरीब रुग्णांना मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गरजूंवर मोफत शिबीराच्या माध्यमातून केलेल्या सेवेमुळे त्यांचा दुवा मिळत आहे. आज लहानपासूनच डोळ्यांच्या विकारात वाढ झालेली दिसून येते. विशेषत: मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही याचा डोळ्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यासाठी नियमित नेत्रतपासणी केल्यास वेळी उपचार होऊ शकतो, असे सांगितले.
अशोक शिंगवी म्हणाले, नेत्र विभागाची सेवा मी जवळूनन पाहिली आहे. आधार नसलेल्यांना आपुलकीची सेवा येथे मिळते. तपासणीबरोबर शस्त्रक्रिया व त्यानंतरचे सोपस्कारही पूर्ण केले जातात. प्रास्तविकात संतोष बोथरा यांनी हॉस्पिटलच्यावतीने होत असलेल्या सेवा कार्यात अनेकांचे योगदान असल्याचे सांगितले. दानशूर व्यक्तींमुळेच हॉस्पिटलची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. प्रगतीचा व अत्याधुनिक सेवेचा लाभ सर्वसामान्यांना माफक दरात व्हावा, रुग्णांना पुणे-मुंबई सारख्या सुविधा येथे मिळाव्यात हाच आमचा प्रयत्न आहे. गेल्या ६ वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नेत्र तपासणी विभाग कार्यान्वित करण्यात आला. अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आजपर्यंत ५५ हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाल्या. नगरसह बीड, औरंगाबाद, पुणे अशा १५ ठिकाणी नेत्रालयाचे सेंटर कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS