अहमदनगर | नगर सह्याद्री- सारसनगर परिसराच्या विकासाला आमदार संग्राम जगताप यांनी नियोजनबद्ध व कायमस्वरूपी चे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळ...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
सारसनगर परिसराच्या विकासाला आमदार संग्राम जगताप यांनी नियोजनबद्ध व कायमस्वरूपी चे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे नागरी वसाहती मोठ्या प्रमाणात वाढत आहे नगर शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांचा विश्वास संपादन करून शाश्वत विकास सुरू आहे.सारसनगर परिसर हा विकास कामातून बदलत आहे सारसनगर परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचार व लहान बालकांना मोफत लस मिळावी यासाठी मनपाच्या वतीने आरोग्याचे उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहे नगरसेवक प्रकाश भागानगरे हे जनतेला २४ तास उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी आहे.असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
सारसनगर मध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईन कामाचा शुभारंभ हभप प्रभाताई भोंग यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विजया माने, लता तिवारी ,मंगल लोकरे, योगिता गुंजाळ, विजया परदेशी, नूतन परदेशी, रूपाली बंग, उषाताई भोंग ,आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सारसनगर परिसरातील विकासाचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी आम्ही चारही नगरसेवक प्रयत्न करीत आहे. पुढील वर्षभरामध्ये सारसनगर मधील विविध विकासाचे प्रश्न मार्गी लागले जातील या भागामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नगर शहरातील खेळाडूंसाठी क्रीडा संकुलनाचे काम सुरू झाले आहे ते काम लवकरच पूर्ण होऊन खेळाडूंना सरावासाठी व मार्गदर्शनासाठी उपलब्ध होणार आहे सारसनगर उपनगराचा विकास कामातून नक्कीच कायापालट करू नागरिकांच्या सहकार्यातून विकास कामांना गती मिळाली आहे असे ते म्हणाले
COMMENTS