मुंबई /नगर सह्याद्री- माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना देतानाच मुंबई...
मुंबई /नगर सह्याद्री-
माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना देतानाच मुंबई उच्च न्यायालाने आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जरी केले आहेत.
कोल्हापुरात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा सवाल न्यायालयाने केला.या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून आज कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त आहे. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासह कागल तालुक्यातील सेनापशी, कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी शाखेवर छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तसेच मुरगूड पोलिस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
COMMENTS