नवी दिल्ली /नगर सह्याद्री- : फसवणुकीच्या प्रकरणात मदत मागायला गेलेल्या महिलेबरोबर एका पोलीस इन्स्पेक्टरने असिस्ट वर्तन केल्याची घटना नुकतीच...
नवी दिल्ली /नगर सह्याद्री-
: फसवणुकीच्या प्रकरणात मदत मागायला गेलेल्या महिलेबरोबर एका पोलीस इन्स्पेक्टरने असिस्ट वर्तन केल्याची घटना नुकतीच घडली.
या महिलने एका बिझनेसमनला 15 लाख रुपये दिले होते. बिझनेसमन पैसे परत करत नव्हता. पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांची मदत मागण्यासाठी म्हणून महिला पोलीस ठाण्यात गेली होती.
तेथे झाले उलटेच.पोलीस इन्स्पेक्टरने महिलेची तक्रार तर नोंदवून घेतली.पण त्यानंतर तो मोबाइलवरुन तिला मेसेज करु लागला. या प्रकारामुळे महिला भांबावून गेली. तिने त्याच्या कुठल्याही मेसेजला प्रतिसाद दिला नाही. बंगळुरुच्या एका पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.या इन्स्पेक्टरने महिलेला फोन करुन पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितलं. महिला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर या इन्स्पेक्टरने तिला ड्राय फ्रुटसचा बॉक्स दिला व सोबत हॉटेल रुमची चावी दिली.या प्रकाराने महिला बावचळून गेली “इन्स्पेक्टरने वस्तू देऊ केल्या, तेव्हा मला धक्का बसला. मी त्या वस्तू घेण्यास नकार दिला व तडक पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली” असं या महिलेने सांगितलं. महिलेने या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
COMMENTS