सुपा | नगर सह्याद्री माहेर सेवाभावी संस्थेच्या वतीने केडगाव, अहमदनगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्राचे भूमिपूजन आणि महिला दिनाचे औचित्य साधून...
सुपा | नगर सह्याद्री
माहेर सेवाभावी संस्थेच्या वतीने केडगाव, अहमदनगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्राचे भूमिपूजन आणि महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचा विशेषतः वृद्ध महिलांचा वृक्ष आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक विजय पठारे होते.यावेळी माहेर सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका तसेच आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्षा सुप्रिया मंडलिक, आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय संस्थेच्या पारनेर तालुयाच्या कर निरीक्षक अधिकारी सुजाता गोरे, श्री स्वामी समर्थ केंद्राचे जिल्हाधिकारी खेमनार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविक आणि स्वागत अनिता जगताप यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना विजय पठारे म्हणाले की, माहेर संस्थेकडून वृद्ध माहेरवाशीणींचा सन्मान करण्यात आला, हे कार्य कौतुकास्पद आहे. एका महिलेने दुसर्या महिलेचा सन्मान करणे गरजेचे आहे आणि समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान माहेर संस्था दरवर्षी करते ही अभिमानाची गोष्ट वाटते. कार्यक्रमा दरम्यान अर्चना मोहिते, प्रियंका सत्रे, हेमा काळे, मयुरी वाघ, काकडे इत्यादी महिलांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार वैशाली डोरले यांनी मानले.
COMMENTS