अहमदनगर | नगर सह्याद्री- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिळालेले सुवर्णपदक डॉ. संदीप कळमकर यांचीच देणं असल्याचे प्रतिपादन पैलवान आतिश तोडक...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिळालेले सुवर्णपदक डॉ. संदीप कळमकर यांचीच देणं असल्याचे प्रतिपादन पैलवान आतिश तोडकर यांनी केले.
अतिश तोडकर याने ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील ५७ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले. वडील सुनील तोडकर यांनी जमीन विकून मुलगा अतिशला कुस्तीसाठी प्रोत्साहित केले होते. अतीश तोडकर याने पहिल्या स्पर्धेत कांस्य, दुसर्या स्पर्धेत रौप्य तर तिसर्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तो आतापर्यंत १६ राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह आठ पदके जिंकली.
रुग्णांची सेवा हे कर्तव्यच ....
पैलवान अतिश तोडकर याने कुस्तीत मिळवलेले सुवर्णपदक ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. त्याने त्याची जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळविले आहे. अतिशने आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिंपिक मध्ये खेळून देशाचे नाव मोठे करावे. शस्त्रक्रिया करणे तसेच गोरगरीब रुग्णांची सेवा करणे एक डॉटर म्हणून माझे कर्तव्यच आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या मल्लांना हरवून त्याने ठसा निर्माण केला आहे. आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक स्पर्धेत खेळण्याचे ध्येय अतिशचे आहे. अपघातात अतिशचा पाय फ्रॅचर झाला होता. आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रियेसाठी त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता. त्याचवेळी डॉ. संदीप कळमकर यांना अतिश कुस्तीपटू असल्याचे समजले. त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केली. त्यामुळे डॉ. संदीप कळमकर यांच्यामुळेच मी कुस्ती खेळत असून मला मिळालेले सुवर्णपदक डॉ. कळमकर यांचीच देण असल्याची भावना अतिशने बोलून दाखवली.
.
COMMENTS