पारनेर | नगर सह्याद्री- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा देशाच्या व राज्याच्या जडणघडणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा असून महाराष्ट्रात...
पारनेर | नगर सह्याद्री-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा देशाच्या व राज्याच्या जडणघडणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा असून महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम त्यांनी केले आहे. परंतु पारनेर तालुयातील काही तथाकथित संघटनांनी शरद पवार यांच्या विरोधात गो बॅक आंदोलन करण्याचा पवित्र घेतला असून हे भरकटलेल्या माणसिकतेचे लक्षण असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी महाराष्ट्रात आदर्श असे काम उभे केले असून मतदारसंघातील सात हजार गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकल व शंभर गरिबांना घरे वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकाचे लोकार्पण पण होणार आहे. एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला जर कोणी सवंग प्रसिद्धीसाठी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर हे निश्चित चुकीचे असल्याचा आरोप पवळे यांनी केला. शरद पवारांमुळेच पुणे, चाकण, भोसरी, रांजणगाव, सुपा, बारामती, आळंदी यांसह महाराष्ट्रात मोठ्या औद्योगिक वसाहती उभी राहील्या आहेत.
पवार यांनी देशासमोर महाराष्ट्राच्या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून बेरोजगारीवर नियंत्रण ठेवले असुन अनेक परप्रांतीय सुद्धा मोठ्या प्रमाणावर महाष्ट्रात गुणागोंविंदाने काम करत आहेत. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनत आहे. त्यांचे राजकारणातील योगदान मोलाचे असुन त्यांनी कला, क्रीडा, शिक्षण,सुरक्षा आदी अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम काम करून मोठा आदर्श समाजा समोर ठेवला आहे. त्यांच्यांकडे असणारी कार्यकुशलता तरुणांसाठी आदर्श आहे. आज बेरोजगारीचा गंभीर प्रश्न देशासमोर असताना महाराष्ट्रात त्यांनी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. भविष्यात शरद पवार हे बेरोजगार मुक्तीचे जनक म्हणून त्यांची नवी ओळख उभी होईल. पारनेर तालुयातील निघोजमध्ये उत्तम विकास कामांसह सामाजिक कार्य घडत असताना त्याला लावले जाणारे गालबोट निंदनीय आहे. हे तर भरकटलेल्या माणसिकतेच लक्षण आहे.
COMMENTS