अहमदनगर | नगर सह्याद्री प्रभागाच्या विकासात नगरसेवकाची भुमिका सर्वांत महत्वाची असते. नगरसेवकांची मानसिकता, कल्पकता असेल तर प्रभागातील कामे...
अहमदनगर | नगर सह्याद्री
प्रभागाच्या विकासात नगरसेवकाची भुमिका सर्वांत महत्वाची असते. नगरसेवकांची मानसिकता, कल्पकता असेल तर प्रभागातील कामे नक्कीच मार्गी लागतात. त्यासाठी नागरिकांचाही पाठपुरावा आवश्यक आहे. दोघांच्या समन्वयातून आपल्या भागाचा कायापालट होऊ शकतो. हे प्रभाग दोन मध्ये शय झाले आहे. प्रभाग क्र.२ मधील अनुभवी नगरसेवकांमुळे निधी उपलब्ध होण्यास मदत होते.
माजी नगरसेवक निखिल वारे यांनी लक्ष्मीनगर येथील ड्रेनेज कामासाठी माझ्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन निधी उपलब्ध केल्याने त्यांच्या प्रयत्नातून आज या भागातील ड्रेनेज कामाचा शुभारंभ होत आहे, असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले. नगर-औरंगाबाद रोडवरील सर्वात पहिली असलेली लक्ष्मीनगर गृहनिर्माण सोसायटीमधील बंद पाईप गटार योजना कामाचा शुभारंभ उपमहापौर भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
उपमहापौर भोसले म्हणाले, हा प्रभाग मोठा असल्याने प्रत्येक कॉलनीचे प्रश्न सोडविणे नगरसेवकांना आव्हान होते, पण काम करण्याची या चौघा नगरसेवकांची पद्धत वेगळीच आहे. कामे करुन घेण्यासाठी पक्षविरहित संबंध सर्वाशी ठेवून नागरिकांच्या मागणीप्रमाणे उपनगराचा विकास ते साधत आहेत. खा.सुजय विखे, आ.संग्राम जगताप, महापौर, उपमहापौर यांच्याकडे पाठपुरावा करुन ते जास्ती निधी प्रभागात आणून विकास कामे करतात ही कौतुकास्पद बाब आहे.
निखिल वारे म्हणाले, लक्ष्मीनगर भागातील ड्रेनेज कामासाठी उपमहापौर यांच्याकडे निधी मागितला, त्यांनी ती मागणी तात्काळ मान्य केली. प्रत्यक्षात निधी आल्यावर त्यांच्या सहकार्याने आज या भागात कामास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने या परिसरातील सर्व ड्रेनेज कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीन असे सांगितले.
प्रास्तविकात सूर्यकांत झेंडे यांनी सांगितले की, आम्हाला प्रभागातील कामांसाठी कधीच भांडावे लागले नाही, चारही नगरसेवकांच्या अभ्यासपूर्ण कामांमुळे ते स्वत: पाठपुरावा करुन प्रश्न सोडवितात याचा आम्हाला अभिमान वाटतो.नागरिकांच्यावतीने उपमहापौर गणेश भोसले यांनी ड्रेनेज कामासाठी निधी दिल्याबद्दल त्यांचा नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र सरमाने यांनी आभार मानले.
याप्रसंगी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत झेंडे, एकनाथ खिलारी, राजेंद्र सरमाने, रंगनाथ मोरे, डॉ.निलेश बुधवंत, राजेंद्र शेटे, वसंतराव सरमाने, राजू कासारे, अविनाश शिंदे, तुकाराम चव्हाण, महादेव दहिफळे, गोरक्षनाथ मोरेे, हिरामण भुजबळ, छबुराव केंदळे, मंदा राशिनकर, संगिता भागवत, नंदा लगड, सचिन वारे, सचिन गाडे, सचिन सानप, भालेराव आदि उपस्थित होते.
COMMENTS