कोल्हापूर/ नगर सह्याद्री- कोल्हापुरातील बोंद्रे नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका मुलीने राहत्या घरी आत्महत्या केली. नकु...
कोल्हापूर/ नगर सह्याद्री-
कोल्हापुरातील बोंद्रे नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका मुलीने राहत्या घरी आत्महत्या केली. नकुशा बोडके असं मुलीचे नाव आहे. नकुशाने युवकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत लिहिलं आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.
कोल्हापूर शहरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात नकुशा बोडेकर ही राहत होती. तिचे दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर ती परिसरातील घर कामे करून कुटुंबाला हातभार लावत होती. चार दिवसांपूर्वीच ती नातेवाईकांच्या बोंद्रेनगर इथल्या घरी आली होती.काल दुपारी घरी कोणीही नसताना तिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने कागदावर लाल शाहीने दोन चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये तिने युवकाचे नाव लिहून ताे आपल्याला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत असे शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याचा आरोप केला आहे.
COMMENTS