नवी दिल्ली /नगर सह्याद्री - जगातली सगळ्यात मो ठी चोरी ३३ वर्षांपूर्वी १८ मार्च १९९० ला बोस्टनच्या इसाबेला स्टिवर्ट गार्डनर म्युझियममध्ये...
नवी दिल्ली /नगर सह्याद्री-
जगातली सगळ्यात मो
ठी चोरी ३३ वर्षांपूर्वी १८ मार्च १९९० ला बोस्टनच्या इसाबेला स्टिवर्ट गार्डनर म्युझियममध्ये झाली होती. या चोरीने अमेरिकेसह संपूर्ण जगाला हादरवून सोडलं.होत. या म्युझियममधून अरबो रुपयांच्या तब्बल १३ कलाकृती चोरीला गेल्या होता.सगळ्यात धक्कादायक म्हणजे ही चोरी करणारे अद्याप पकडले गेलेले नाहीत तसेच कलाकृती सुद्धा सापडलेल्या नाहीत. चोरांना पकडून देणाऱ्याला आजही मोठी रक्कम म्हणजे तब्बल ८० कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत .१८ मार्च १९९० ला सकाळी दोन चोरांनी बनावट पोलीस अधिकाऱ्यांचा पेहराव केला आणि बोस्टनच्या इसाबेला स्टिवर्ट गार्डनर म्युझियममध्ये घुसले. यानंतर ते म्युझियमच्या तळघरात गेले आणि तिथे असलेल्या इतर दोन पोलीस सुरक्षा रक्षकांना मारून त्यांनी बांधून ठेवलं. यानंतर त्यांनी सहज १३ कलाकृती चोरल्या आणि फरार झाले. ज्या कलाकृती चोरल्या गेल्या त्यामध्ये रेम्ब्रांट, डेगास, मानेट आणि वर्मीर यांच्या कलाकृती होत्या. ज्याची किंमत तब्बल ४० अब्ज रुपये आहे.चोरी झाल्यापासून आतापर्यंत या संग्रहालयातील फ्रेम रिकाम्या आहेत. असं बोललं जातं की एक बॉक्स कटर आणि रेजर चाकूच्या मदतीने फ्रेमला कापण्यात आलं होतं.चोरीबाबत माहिती देणाऱ्यांना संग्रहालयाकडून 1 मिलियनचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. जे सात वर्षांनी वाढवून ५ दशलक्ष करण्यात आले. आता या अमूल्य कलाकृती मिळवण्यासाठी मदत करणाऱ्यांना १० दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा करण्यात आली आहे.पण ही चोरी ही सगळ्यांसाठी अजूनही मोठं गूढ आहे.
COMMENTS