निघोज | नगर सह्याद्री आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून निघोज व परिसरात सर्वाधिक विकासकामे ...
निघोज | नगर सह्याद्री
आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून निघोज व परिसरात सर्वाधिक विकासकामे झाली असल्याची माहिती दिपक आण्णा लंके यांनी दिली आहे.
निघोज येथील बैलगाडा शर्यत होण्यासाठी घाट दुरुस्ती तसेच नियोजनासाठी आमदार लंके यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. उपसरपंच माऊली वरखडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी साई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष व लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठान पदाधिकारी मंगेश लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रमेश ढवळे, संतोष रसाळ, प्रसिद्ध बैलगाडा मालक सुभाष कवाद, कांदा व्यापारी खंडू घुले, निघोज सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे, संचालक शांताराम कवाद, कांदा व्यापारी दिलीप कवाद, राजेंद्र ढवळे आदी व बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लंके म्हणाले गेली पन्नास वर्षे झाली नाहीत एवढी कामे गेल्या साडेतीन वर्षात झाली आहेत. निघोज परिसरात पन्नास कोटी पेक्षा जास्त निधी आणुन निघोजच्या जनतेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उपसरपंच माऊली वरखडे, रमेश ढवळे, दिलीप कवाद, संतोष रसाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बैलगाडा शर्यतीत आंबेगाव, जुन्नर, शिरुर, पारनेर तालुयातील शेकडो बैलगाडे सहभागी झाले होते. तब्बल दोन दिवस बैलगाडा शर्यत सुरू होती. दरवर्षी कपिलेश्वर यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. दरवर्षी लाखो रुपयांची बक्षीसे देण्यात येतात. यावर्षी सुद्धा दोन लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उगले, हे.कॉ.पी. एच. डहाळे, तोरडमल व त्यांच्या सहकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
बैलगाडा शौकीन व निघोज सोसायटीचे संचालक शांताराम कवाद यावेळी म्हणाले आमदार नीलेश लंके यांनी घाट सुशोभीकरण साठी दहा लाख रुपये देऊन एक चांगला बैलगाडा शर्यत घाट तयार करण्याचे काम या निधीच्या माध्यमातून झाले आहे. निघोज व परिसरात बैलगाडा शर्यत शौकीन मोठ्या प्रमाणात असून ग्रामस्थ तसेच लामखडे वरखडे मंडळ, कपिलेश्वर बैलगाडा शर्यत उत्सव मंडळ या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कपिलेश्वर यात्रा उत्सव साजरा झाला असून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात योगदान मिळाले असल्याची माहिती कवाद यांनी दिली.
COMMENTS