मुंबई /नगर सह्याद्री - जगात व्हॉट्सअॅप सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. गेल्या काही वर्षात याच व्हॉट्सअॅपनं कात टाकत बदल केले आहेत.हाता...
मुंबई /नगर सह्याद्री -
जगात व्हॉट्सअॅप सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. गेल्या काही वर्षात याच व्हॉट्सअॅपनं कात टाकत बदल केले आहेत.हातात तर तुमचा मोबाइलला चार्जिंग नसल्याने बंद झाला असेल किंवा तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरी सुद्धा तुम्हाला मेसेजिंग चालूच ठेवता येणार आहे .
ही सुविधी डेस्कटॉप व्हॉट्सअॅपसाठी असणार आहे. कंपनीने स्वत: ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.
डेस्कटॉप व्हॉट्सअॅपवरून युजर्स आता ऑडिओ आणि ग्रुप व्हिडीओ कॉलही करू शकतात. व्हॉट्सअॅपनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “चार्जर नसलं तरी चिंता करू नका. आता तुम्ही व्हॉट्सअॅप चार डिव्हाईससोबत लिंक करू शकता. फोन स्विच ऑफ जरी झाला तरी चॅट इंक्रिप्टेड, सिंक्ड चालू राहील.”“तुमचा मोबाईल व्हॉट्सअॅप डेस्कटॉपला कनेक्ट व्हावा यासाठी आम्ही विंडोजसाठी नवं अॅप तयार केलं आहे.हे अॅप पटकन लोड होईल. त्याचा इंटरफेसपण ओळखीचा असल्याने चॅटिंग करताना अडचण येणार नाही.”, असंही पुढे नमूद केलं आहे.
COMMENTS