अहमदनगर | नगर सह्याद्री नगरमध्ये बनावट माणसे उभी करून खरेदी विक्रीचे प्रकार घडत आहेत. त्यात आता आणखी एका प्रकरणी कोतवाली पोलिसात फिर्याद दाख...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगरमध्ये बनावट माणसे उभी करून खरेदी विक्रीचे प्रकार घडत आहेत. त्यात आता आणखी एका प्रकरणी कोतवाली पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे विकणारा बनावट व जागा मालकाची बनावट कागदपत्रे, बँक खाते,आधारकार्ड तयार करून हा प्लॉट विकण्यात आला आहे. कल्याण रोडवरील मेवाडनगरचा हायवे टच प्लॉट असून या संदर्भात रामेश्वर बालुराम कलवार यांनी तक्रार दिली आहे पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.
मी रामेश्वर बालुराम कलवार (वय ६२ वर्षे, धंदा - व्यापार, मु. रा. सोसर सदन,चैतन्य नगर)यांनी फिर्यादीत म्हटले आहे ,नालेगांव अहमदनगर येथे सर्व्हे क्रमांक १७/४ मधील प्लॉट क्षेत्र १५८४.०० चौ.मी. हा प्लॉट माझे वडील बालुराम रघुनाथ कलवार यांनी १९९७ मध्ये (खरेदी खत, दस्त क्र.३४७४/१९९७) प्रविणकुमार पोपटलाल कटारीया यांच्याकडुन खरेदी केला होता. ७/१२ उतार्यावर वडीलांचे नाव होते. वडील हयात असतांना त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार प्लॉट मिळकत माझे नावे लिहुन ठेवली होते.वडील बालुराम कलवार हे राजस्थान येथे मयत झाले असुन त्यांच्या मृत्युची नोंद भिलवाडा, राजस्थान येथे झालेली आहे. व्यवसाया निमीत्त बाहेरगावी जात असल्याने व २०१९ नंतर कोव्हीड प्रादुर्भाव असल्याने मृत्यु प्रमाणपत्रा प्रमाणे माझ्या नावाची नोंद तलाठी कार्यालयात करणे राहुन गेले होते.
३ मार्चं रोजी तलाठी कार्यालयात प्लॉटचा कर भरण्यासाठी माझ्या कंपनीचे व्यवस्थापक प्रल्हाद राय पुरोहित यांना पाठविले होते. त्यावेळी प्लॉटच्या ७/१२ उतार्यावर सुवेंद्र संतोष डाबी यांच्या नावाची नोंद झाली असल्याचे मला समजले. सुवेंद्र संतोष डाबी यांनी माझे वडील मयत असतांना देखील त्यांच्या जागी कोणीतरी तोतया इसम उभा करुन प्लॉट विक्री केल्याची खात्री झाली.वडीलांचे बनावट आधार कार्ड क्र.५७५९७२२९३१२८ व बनावट पॅन कार्ड क्र.२०९६या प्रमाणे तयार करुन त्यावरील पत्ता हा चुकीचा आहे.खरेदीच्या व्यवहारापोटी लिहून देणाराला त्यांच्या कोटक महिंद्रा बँक, शाखा नागापुर,येथून आर.टी.जी. एस. व चेक क्र ००००४३ ते ००००४७ प्रमाणे दिलेले आहेत.
या खरेदीला निल शरद कांबळे (रा. अहमदनगर) व मोहन अशोक वाटमारे (रा अहमदनगर) यांनी ओळख दिलेली आहे.दस्ताच्या ड्राफवर साक्षीदार म्हणुन अनिरुध्द सुभाष पाटील (रा नालेगांव)अक्षय राकेश ओस्वाल (रा. श्रीगोंदा)यांनी सही केलेली आहे. सुवेंद्र संतोष डाबी,निल शरद कांबळे, मोहन अशोक वाटमारे, अनिरुध्द सुभाष पाटील, अक्षय राकेश ओस्वाल यांनी संगनमताने बनावट खरेदी खताने ४४,३५,५००/-रुपये किंमतीस प्लॉट विक्री केला आहे. पुढील तपास गजेंद्र इंगळे करित आहेत.
COMMENTS