मुंबई। नगर सहयाद्री- मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या समर्थक कार्...
मुंबई। नगर सहयाद्री-
मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अश्लील मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला.
वृत्तसंस्थाच्या माहीती नुसार, प्रकाश सुर्वे यांनी काल रात्रभर दहिसर पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. तसेच व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांनी मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
काल बोरिवली दहिसर भागात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान खुल्या जीपमधून जात असतानाचा आमदार प्रकाश सुर्वे आणि शितल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ विरोधकांकडून सोशल माध्यमात अश्लील मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला.
दरम्यान, 'राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?'असं म्हणत शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे गटाला उद्ध्वस्त गट असं म्हटलं आहे.
COMMENTS