यवतमाळ / नगर सहयाद्री - यवतमाळ मधील बाभूळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आहे. बाभूळगाव नगर पंचायत कार्यरत असलेल्या नगरसेवक अनिकेत गावंडे यां...
यवतमाळ / नगर सहयाद्री -
यवतमाळ मधील बाभूळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आहे. बाभूळगाव नगर पंचायत कार्यरत असलेल्या नगरसेवक अनिकेत गावंडे यांची काल मध्यरात्री धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. वाळूच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर अली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक अनिकेत गावंडे यांची हत्या झाल्याची घटना आहे. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाळु व्यवसायात पाय रोवल्यामुळे अनिकेतची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. नंतर प्रहारकडून नगरपंचायत निवडणूक लढून निवडून आला होता.
अनिकेतच्या हत्येने बाभुळगावात खळबळ उडाली आहे. वाळु व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर अनिकेतने राजकारणात प्रवेश केला होता. बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धीही वाढले. पण, काल रात्री अचानक अनिकेतवर शस्त्राने वार करण्यात आले. त्यात अनिकेतचा जीव गेला.
COMMENTS