मुंबई। नगर सहयाद्री मुंबईतील विरार शहरात संतापजनक घटना घडली आहे. प्रेयसीसोबत बाहेर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोन जणांनी अडवलं. त्याला झा...
मुंबई। नगर सहयाद्री
मुंबईतील विरार शहरात संतापजनक घटना घडली आहे. प्रेयसीसोबत बाहेर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोन जणांनी अडवलं. त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. आरोपी इतक्यावर थांबले नाही. दोघा आरोपीची नियत फिरली आणि दोघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर विरार पोलिस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दोघां विरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही शहराजवळील टेकडीवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास फिरायला गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी दोन जण आले आणि त्यांनी प्रियकरासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. यादरम्यान, प्रेयसी मध्यस्थी करत असताना दोघांचीही नियत फिरली.त्यांनी तरुणीच्या प्रियकराला झाडाला बांधलं त्यानंतर तिच्यावर सामुहिक अत्याचार केला.
प्रियकराने कशीबशी सुटका केली. या दोघांना विरोध करताना त्याने बाजूला पडलेली काचेची बाटली एकाच्या डोक्यावर मारली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. या भयानक घटनेनंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर विरार पोलिस घटनास्थळी दाखल झाले.तरुणीला उपचारासाठी दाखल करून, त्यांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन एक जखमी आरोपी उपचारांसाठी दवाखान्यात येईल, अशा सूचना दिल्या होत्या दरम्यानच्या काळात फरार आरोपींपैकी एक जण जखमी असल्याने एका डॉक्टरकडे उपचारासाठी गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा विरार पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी आरोपींवर जबरी चोरी, खंडणी, बलात्कार, अनैसर्गिक बलात्कार अशा स्वरूपाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
COMMENTS