मुंबई। नगर सहयाद्री - मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यांवारून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत यांनी अतिशय धाडसी वक्तव्य क...
मुंबई। नगर सहयाद्री -
मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यांवारून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत यांनी अतिशय धाडसी वक्तव्य केलं आहे. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट आहे.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, काल रात्री वडार समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत पंढरपूर येथे आले होते. चंद्रभागा मैदानावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या. त्यांच्या सभांना जितकी गर्दी जमली नाही, त्यापेक्षा अधिक गर्दी सावंत बंधूनी याच मैदानावर जमवून दाखवली, असं मोठं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.
आरोग्यमंत्र्यांनी भाषणबाजीत सर्वात आधी देशाच्या आदरणीय नेत्यांसोबतच आपली तुलना केल्यानं उपस्थितीतांमध्ये देखील अस्वस्थता सुरु झाली. यानंतर त्यांनी आपल्याला सोलापूरचे पालकमंत्रीपद मागत होतो, असे सांगत जर मला सोलापूरचं पालकमंत्री केलं तर किती अनुदान मिळतं, हे दाखवून दिलं असतं, असं सांगत तानाजी सावंतांनी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना टोलाही लगावला आहे.
२०१८ मध्ये उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर झाली होत. या सभेचे नियोजन मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे होते. या सभेला सात लाख लोक आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अलीकडेच मालेगाव येथील उध्दव ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्या सभेला उद्देशून बोलत असताना सावंत यांनी जे बाळासाहेबांना जमलं नाही ते सावंत बंधूनी पंढरपुरात करुन दाखवल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
COMMENTS