पारनेरच्या शिंदे पाटलांचा शिर्डीत डंका पारनेर | नगर सह्याद्री शिर्डी येथे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या महा पशु...
पारनेरच्या शिंदे पाटलांचा शिर्डीत डंका
पारनेर | नगर सह्याद्री
शिर्डी येथे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या महा पशुधन एस्पो या देशपातळीवरील प्रदर्शनात अश्व गटात राहुल शिंदे पाटील यांच्या ’व्हिटर’ अश्वाचा प्रथम क्रमांक आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्योजक अभिजीत शिंदे यांनी हे पारितोषिक स्विकारले. या प्रदर्शना दरम्यान अश्वगटात या व्हिटर अश्वचा बोलबाला या प्रदर्शनात पाहायला मिळाला.
आजच्या काळातही शिंदे कुटुंबाने पूर्वापार चालत आलेली अश्वपालन परंपरा टिकवली आहे. त्यांच्याकडे १५ उमदे घोडे आहेत त्यातीलच महाराष्ट्रामधील नावाजलेला सर्वगुणसंपन्न असा स्टॅलियन व्हिटर घोडा असून त्याची ऊंची ६६ इंच, त्यास देवमन असून त्याचे ब्रिडींग रिझल्ट्सही उत्तम आहेत. प्रदर्शनामध्ये त्यास पाहण्यास अनेक लोकांची गर्दी होत होती. या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही या अश्वाचे तोंडभरून कौतुक केले. शिर्डी पशुधन प्रदर्शनात देशभरातुन ३५ अश्व येथे आले होते विविध गुण अंकानुसार या अश्वामधुन व्हीटर या अश्वाची प्रथम क्रमांकासाठी निवड केली आहे.
व्हिटर अश्व व मालकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सत्तारांची कौतुकाची थाप
महा पशुधन एस्पो मध्ये पारनेर तालुयातील रांजणगाव मस्जिद येथील शिंदे पाटील कुटुंबातील तीन अश्व या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते.या प्रदर्शनात लाखो शेतकर्यांसह पशुप्रेमिनी भेट दिली असता व्हिटर अश्व हा चर्चेचा विषय बनला होता. या उद्घाटनाच्या प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी या व्हिटर अश्वचे कौतुक केले तर दुसरीकडे या प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा या व्हिटर अश्वावर व त्यांचे मालक अभिजीत शिंदे व राहुल शिंदे यांच्यावर कौतुकाची थाप टाकली.
COMMENTS